काही मानसिक आजारात योग्य त्या उपचारानंतरही रुग्ण पूर्ववत किंवा निदान दैनंदिन व्यवहार पार पाडण्याइतपतही सक्षम होत नाही. कारण या मानसिक आजारामुळे (उदा. स्किझोफ्रेनिया) रुग्णाची स्मरणशक्ती, बुद्धी आणि एकाग्रता ह्यात झालेला बिघाड, नेहमीचे उपचार (म्हणजे औषधी आणि इतर) ठीक करू शकत नाहीत.

या लक्षणांचा परिणाम त्यांच्या रोजच्या जीवनातील आवश्यक कामांवर झालेला दिसून येतो. उदा. सुनियोजित घरकाम करणे, बाजारातून ठरवलेल्या वस्तू आणणे, साधे पैशाचे व्यवहार करणे, जबाबदारीची कामे करणे, एकट्याने प्रवास करणे अशासारखे रोजचे व्यवहार आपले आपल्याला करता आले नाहीत तर त्याचा परिणाम म्हणजे परावलंबन आणि व्यक्ती मधील संबधात बिघाड हा असतो.

अशा छुप्या व व्यक्तीची कार्यक्षमता कमी करणाऱ्या लक्षणांचा उपचार करण्यासाठी कॉग्नीटीव्ह पुनर्वसन ही उपचार पद्धती वापरता येते. कॉग्नीटीव्ह या शब्दाचा अर्थ बोधनक्षमता.

या उपचार पद्धतीचा वापर करण्यासाठी निपुण व्यक्ती हवी, अशा तज्ञ व्यक्तीसाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या टेस्ट करण्याची सोय हवी व तसे वातावरण हवे. या सर्व सोयी येथे उपलब्ध आहेत आणि स्किझोफ्रेनियाच्या रुग्णासाठी हा दिलासा शांती नर्सिंग होमच्या डे केअर सेंटर मध्ये आहे.