स्किझोफ्रेनिया आणि इतर जुन्या मानसिक आजारात इसीटी आणि औषधोपचाराशिवाय इतर पूरक उपचार हे खूपच महत्वाचे आणि रुग्णाला उभारी देणारे असतात. शांती नर्सिंग होमच्या डे केयर सेंटर मध्ये असे उपचार सायकीयाट्रिस्ट, ऑक्युपेशनल थेरपीस्ट, सोशल वर्कर्स, सायकॉलॉजिस्ट, कॉग्निटिव्ह मेडिएशन थेरपीस्ट इत्यादी तज्ञ मंडळींमार्फत केले जातात.

भावना, कामाची प्रेरणा, मोकळेपणा, परस्पर संबंध, सुसंवाद, लक्षात राहणे, नेहमीचे काम व्यवस्थित करता येणे इत्यादी नॉर्मल व्यक्तींमध्ये आढळणाऱ्या गोष्टींचा अभाव ज्यास अभावाची लक्षणे म्हणतात. ब-याच वेळा नेहमीची औषधे आणि इ.सी.टी.ने बऱ्या होत नसणाऱ्या रुग्णांना या सेंटरमधील उपचारांचा खूपच फायदा होतो.

या केन्द्रात करण्यात येणारे पूरक उपचार असे :

    • कौन्सेलिंग
    • फॅमिली थेरपी
    • पुनर्वसन
    • वर्तणूक उपचार