शांती नर्सिंग होम व मित्र ग्रुप आयोजित आंतरमहाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धा – २०१८.

नमस्कार…!!!

शांती नर्सिंग होम व मित्र ग्रुप आयोजित आंतरमहाविद्यालयीन वाद विवाद स्पर्धेची प्राथमिक फेरी १०, ११ व १२ सप्टेंबर रोजी शांती नर्सिंग होमच्या परिसरात पार पडली. यात तब्बल १०६ गटांनी आपला सहभाग नोंदवला. या वर्षी स्पर्धेचे स्वरूप विस्तारित होऊन स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपली मते हिरीरीने मांडून युवा विचार शक्तीची चुणूक दाखवली. या चुरशीच्या स्पर्धेत गुणानुक्रमे ०५ गटांची अंतिम फेरीकरिता निवड झाली असून त्यांची यादी प्रसिद्ध करीत आहोत.

स्पर्धेची अंतिम फेरी ०२ ऑक्टोबर रोजी आय. एम. ए. हॉल, औरंगाबाद येथे सायंकाळी ०५ ते रात्री ०८ या वेळेत घेण्यात येणार असून स्पर्धेतील मानाचे समजले जाणारे पुरस्कार
१. उत्कृष्ट वक्ता पुरस्कार - रु. ५०००/- आणि ट्रॉफी
२. समीक्षक पुरस्कार – रु. २०००/- आणि ट्रॉफी
हे ही अंतिम फेरीच्या वेळी जाहीर केले व दिले जातील.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी अंतिम फेरीकरिता उपस्थित रहावे, ही विनंती.
धन्यवाद…..!!!
Final Result

एक टिप्पणी सोडा

Your email address will not be published.

WordPress Video Lightbox Plugin