लाईट ट्रिटमेंट / शॉक ट्रिटमेंट या उपचाराचा वापर खालील मानसिक आजारात करतात.

    1. उदासपणाचा मानसिक आजार
    2. स्किझोफ्रेनिया
    3. आत्महत्येची प्रवृत्ती असणारे मानसिक आजार
    4. मँनियाचा आजार

लाईट ट्रिटमेंट / शॉक ट्रिटमेंट घेतांना रुग्णाला मुळीच त्रास होत नाही. योग्य प्रकारे वापरल्यास धोका होत नाही आणि अतिशय परिणामकारक अशी ही इलाज पद्धत आहे. It is painless, safe and very effective treatment. (ही वेदनारहित, सुरक्षित आणि अत्यंत परिणामकारक उपचारपद्धती आहे.)

शॉक ट्रीटमेंट म्हटल्यावर रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना भिती वाटते, कारण या उपचारासंबंधी प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या आणि चुकीच्या कल्पना आहेत.

आजपर्यंत शांती नर्सिंग होममध्ये निदान दोन लाखावर ई.सी.टी. दिले आहेत. अनुभव असा आहे की बऱ्याच रुग्णांना सुरुवातीस भितीपोटी ई.सी.टी. नको वाटतो, पण एकदा ई.सी.टी.चा अनुभव घेतल्यावर रुग्ण स्वत: अगदी नियमीतपणे येऊन कोर्स पूर्ण करतो. कारण त्रास न होता इतक्या लवकर आपण बरे होऊ शकतो हे त्यांना कळते.

या उपचारास आवश्यक असणारे तज्ञ अनस्थेटिस्ट, मानसरोगतज्ञ व  नर्सिंग स्टाफ शांती नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहे. तसेच ई. सी. टी. देण्याआधी लागणारी सर्व तपास यंत्रणा व ई. सी. टी.साठी लागणारी सर्व अद्ययावत यंत्रे, औषधी व इमर्जन्सी मेडिसीन हे सर्व या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.