लोक आमच्या बद्दल काय म्हणतात

डॉ. ई. मोहनदास

E-Mohandas

डॉ. ई. मोहनदास

सायकीयाट्रिस्ट, थ्रिसुर, केरळ

‘हॉस्पिटलचा आराखडा व मांडणी अतिशय चांगली आहे. तसेच दवाखान्यात मानसिक रुग्णांकरिता आवश्यक असलेल्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयाचा परिसर अतिशय हवेशीर, प्रकाशमान व प्रसन्न आहे.’

डॉ. सुहास जेवळीकर – साहित्यिक आणि भुल तज्ञ विभाग प्रमुख सरकारी मेडीकल कॉलेज, औरंगाबाद.

IMG_0912

डॉ. सुहास जेवळीकर – साहित्यिक आणि भुल तज्ञ विभाग प्रमुख सरकारी मेडीकल कॉलेज, औरंगाबाद.

“निसर्गानं माणसाला घातलेलं सर्वात मोठं कोडं म्हणजे माणूस होय, असं म्हटलं जातं. अशावेळी माणसाचं अंतरंग, मानवी वर्तन आणि मानवी संबधांचा गुंता समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानसशास्त्राचं अनन्यसाधारण महत्व ध्यानात येतं. सभोवारातील निसर्गाचाच माणूसही एक घटक असल्याची जाणीव विसरून निसर्गापासून दूर गेल्यामुळं आणि मानवी संबधांच्या रुक्ष आणि व्यवहारी जाळ्यात अधिकाधिक गुंतत गेल्यामुळेच माणूस स्वतःचं मन:स्वास्थ्य आणि स्वतःची मन:शांती गमावून बसला असं ओशो म्हणतात. या पार्श्वभूमीवर निसर्गाच्या सान्निध्यातच एखादं मानसोपचाराचं केंद्र उभं करणं आणि त्याचं नाव ‘शांती नर्सिंग होम’ ठेवणं ही गोष्ट मला स्वतःला डॉ. विनय बाऱ्हाळे यांची सूक्ष्म व व्यासंगी जाण प्रकट करणारी आहे असं वाटतं. सिमेंटचा गिलावा असणाऱ्या उंच उंच इमारतीत मानवी संबधांचा ओलावा नसेल तर मानवी मन समजून घेणे आणि त्यावर उपचार करणे कसे काय शक्य होईल? नावाप्रमाणेच विनय जोपासणाऱ्या डॉ. बाऱ्हाळे यांच्या व्यक्तिमत्वातील या मानवी ओलाव्याचा अनुभव मी अनेकवेळा घेतला आहे. डोक्यात बुद्धीमत्ता, हातात कौशल्य आणि हृदयात प्रेम असेल तर माणूस काय करू शकतो याचं ‘शांती नर्सिंग होम’ हे अतिशय सुंदर उदाहरण आहे. डॉ. विनय बाऱ्हाळे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अंत:करणपूर्वक अभिनंदन करून या मानसोपचार केंद्राच्या भवितव्यातील उज्वल वाटचालीला सदिच्छा व्यक्त करतो.”

डॉ. राजेंद्र बर्वे – सायकीट्रिस्ट, मुंबई.

Dr. Rajendra Barve

डॉ. राजेंद्र बर्वे – सायकीट्रिस्ट, मुंबई.

“शांती नर्सिंग होम म्हणजे मला Home away from Home याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी संस्था आहे असं वाटलं! इथला कर्मचारी वृंद आणि त्याचे चालक एखाद्या सुरेल ‘ऑर्केस्ट्रा’ प्रमाणे काम करतात ते पाहून खूप समाधान वाटलं.

शांती नर्सिंग होम तर्फे रुग्णांना शांती द्यायची असेल तर आपण सदैव अशांत असायला हवं. अशांत अशासाठी की अजून कोणतं काम करता येईल? कामाचा दर्जा कसा उंचावता येईल? यासाठी अशांत राहू!!”

आदरणीय स्व. नानाजी देशमुख

Nanaji

आदरणीय स्व. नानाजी देशमुख

आदरणीय स्व. नानाजी देशमुख यांच्या शब्दात,

“मानसिक रोगियोका आवासीय उपचार केंद्र भी उच्चतम श्रेणी का, स्वच्छ एवं साफसुथरा हो सकता है इसकी मुझे अपेक्षा नहीं थी। इस कारण यहा की स्वच्छता देखकर मै चकित रह गया।”

डॉ. शरद नांदेडकर

Dr. Sharad Nandedkar

डॉ. शरद नांदेडकर

“आजचा दिवस आमच्यासाठी खरा सुदिन आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक हॉस्पिटल्स पाहण्याचा योग आला. मानसिक रुग्णांसाठी, एखाद्या तरुण तडफदार डॉक्टरने, ध्येयधुंद होऊन चालवलेले कार्य तेही मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागात पाहून अत्यानंद झाला. मन:पूर्वक असे वाटते की भारतातून औरंगाबादच्या जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी येणाऱ्याना हे उत्कृष्ट, सुंदर हॉस्पिटल अवश्य दाखवावे.  किमानपक्षी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला हे शांती नर्सिंग होम जे की खऱ्या अर्थाने मंदीर आहे ते पाहण्यास मिळावे. शासकीय स्तरावर महाराष्ट्र आरोग्य सेवेने तसे प्रयत्न करावेत.

निसर्गरम्य परिसरात, भयग्रस्त झालेल्या, अंधश्रद्धेने  पछाडलेल्या रुग्णांसाठी हे हॉस्पिटल म्हणजे खऱ्या अर्थाने ‘जीवन स्वास्थ्य’ मिळवून देणारे स्वत:चे घरच वाटावे इतके चांगले आहे.

डॉ. विनय बाऱ्हाळे व डॉ. सौ. अनुराधा बाऱ्हाळे यांची ही महान मानवसेवा खरोखरच कौतुकास्पद आहे. शब्द अपुरे पडावेत असे हे कार्य महाराष्ट्रातील इतर डॉक्टरांसाठी खरे तर आदर्श आहे. डॉक्टरांच्या कार्याबद्दल शुभेच्छा देऊन हे त्यांचे कार्य उत्तरोत्तर वाढावे असे मन:पूर्वक प्रामाणिकपणे वाटते.”

डॉ. विद्याधर वाटवे – सायकिट्रिस्ट, पुणे

Dr. Vidyadhar Watve

डॉ. विद्याधर वाटवे – सायकिट्रिस्ट, पुणे

“आज दिनांक १५/०४/२००१ रोजी शांती नर्सिंग होम पाहिले आणि प्रभावित झालो. इतके दिवस फक्त नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचे समाधान वेगळेच होते. भरपूर जागा, सुसज्ज प्रयोगशाळा आणि ग्रंथालय या दुर्मिळ गोष्टींना इथे महत्व दिल्याचे पाहून खरच आनंद वाटला. पुन्हा येताना डॉ. मोहन आगाशेंना घेऊन येण्याचे आश्वासन देऊनच डॉक्टरांचा निरोप घेत आहे.

सर्व डॉक्टर मंडळी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा!”

×
WordPress Video Lightbox Plugin