सन १९७९ पासून मानसिक आरोग्यासाठी कार्यरत . . .
दृष्टी आणि ध्येय
समर्पित भावनेने मानसिक रुग्णाची सेवा करणे.
दृष्टी
- मानसिक रुग्णांचे योग्य ते निदान व उपचार करण्यासाठी लागणाऱ्या उत्कृष्ठ सोयी – सुविधा आपल्या रुग्णालयात निर्माण करणे.
- जनमानसात मानसिक आजारांबद्दल ज्ञान व जागृती निर्माण करणे. त्यासाठी प्रचार व प्रसार माध्यमांचा योग्य वापर करणे. शक्यतोवर मानसिक आजारांबद्दल वाटणारा कलंक (stigma) कमी करण्याचा प्रयत्न करणे.
- मानसोपचारासाठी लागणारे निरनिराळे विभाग त्यासाठी लागणारी सामग्री व तज्ञ व्यक्तींनी परिपूर्ण करणे.
- मानसशास्त्र व मानसोपचार विषयाच्या निरनिराळ्या विद्यार्थ्यांना शिकण्याच्या सोयी
- मानसशास्त्राशी निगडीत संशोधन करून या संशोधनाचा जास्तीत जास्त लाभ करून देण्यासाठी बांधील असणे.
आम्ही वरील सर्व उद्दिष्ठे डोळ्यासमोर ठेऊन मार्गक्रमण सुरु केले आहे. पण ध्येय अजून बरेच दूर आहे पण अशक्य काहीच नाही.
ताज्या बातम्या आणि घडामोडी
लोक आमच्या बद्दल काय म्हणतात
आमची प्रेरणा

'हॉस्पिटलचा आराखडा व मांडणी अतिशय चांगली आहे. तसेच दवाखान्यात मानसिक रुग्णाकरिता आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयाचा परिसर अतिशय हवेशीर, प्रकाशमान व प्रसन्न आहे.'
डॉ. ई. मोहनदास
सायकीयाट्रिस्ट, थ्रिसुर, केरळ

"निसर्गानं माणसाला घातलेलं सर्वात मोठं कोडं म्हणजे माणुस होय, असं म्हटलं जातं. अशावेळी माणसाचं अंतरंग, मानवी वर्तन आणि मानवी संबधांचा गुंता समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मानसशास्त्राचं अनन्य साधारण महत्व ध्यानात येतं."
डॉ. सुहास जेवळीकर – साहित्यिक आणि भुल तज्ञ विभाग प्रमुख सरकारी मेडीकल कॉलेज, औरंगाबाद.

"शांती नर्सिंग होम म्हणजे मला Home away from Home याचा प्रत्यक्ष अनुभव देणारी संस्था आहे असं वाटलं! इथला कर्मचारी वृंद आणि त्याचे चालक एखाद्या सुरेल 'ऑर्केस्ट्रा' प्रमाणे काम करतात ते पाहून खूप समाधान वाटलं."
डॉ. राजेंद्र बर्वे – सायकीट्रिस्ट, मुंबई.

"मानसिक रोगियोका आवासीय उपचार केंद्र भी उच्चतम श्रेणिका स्वच्छ एवं साफसुथरा हो सकता है इसकी मुझे अपेक्षा नहीं थी, इस कारण यहा की स्वच्छता देखकर मै चकीत रह गया।"
आदरणीय स्व. नानाजी देशमुख

"निसर्गरम्य परिसरात, भयग्रस्त झालेले, अंधश्रद्धेने पछाडलेल्या रुग्णांसाठी हे हॉस्पिटल म्हणजे खऱ्या अर्थाने 'जीवन स्वास्थ्य' मिळवून देणारे स्वत:चे घरच वाटावे इतके चांगले आहे."
डॉ. शरद नांदेडकर

"आज दिनांक १५/०४/२००१ रोजी शांती नर्सिंग होम पाहिले आणि प्रभावित झालो. इतके दिवस फक्त नाव ऐकून होतो पण प्रत्यक्ष पाहण्याचे समाधान वेगळेच होते."
डॉ. विद्याधर वाटवे – सायकिट्रिस्ट, पुणे