शांती नर्सिंग होम येथे ८० व्यसनमुक्तांचा सपत्नीक सत्कार

Publication of 'Madyapash'

नर्सिंग होम येथे रविवारी “माणुसकीचा सोहळा’ हा कार्यक्रम झाला. या वेळी १ ते २१ वर्षांपर्यंत जे दारूच्या व्यसनापासून दूर राहिलेल्या ८० व्यसनमुक्तांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद येथील आयर्न मॅन नितीन घोरपडे उपस्थित होते. घोरपडे यांनी स्वत: व्यसनाधीनतेपासून ते आयर्न मॅन पर्यंतचा प्रवास पार केलेला आहे. व्यसनमुक्तीच्या प्रवासात स्वतःची जिद्द आणि पत्नीची संगत फार मोलाची ठरली हे त्यांनी विशेष नमूद केले.

त्याचबरोबर शांती नर्सिंग होमच्या टीमने लिहिलेल्या “मद्यपाश’ या पुस्तिकेच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशनही प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले.

या वेळी डॉ. विनय बाऱ्हाळे यांनी “व्यसन एक मानसिक आजार’ याविषयी माहिती दिली. डॉ. सोनाली देशपांडे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. शांती नर्सिंग होम व मित्र ग्रुपची ओळख सई चपळगावकर यांनी करून दिली. सूत्रसंचालन डॉ. श्रुती ढवळे यांनी केले. डॉ. सुश्रुत पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन मित्र ग्रुपचे प्रमुख डॉ. विनय पाटील, डॉ. चिन्मय बाऱ्हाळे, डॉ. निखिल खेडकर, डॉ. तेजस गयाळ आणि वैशाली दाभाडे यांनी केले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक फासाटे, आरुषी भोरकर, परिणिता खंडागळे, अनिल पवार, सचिन आव्हाड, सचिन गायकवाड आदी यांनी परिश्रम घेतले.

एक टिप्पणी सोडा

Your email address will not be published.

WordPress Video Lightbox Plugin