शांती नर्सिंग होम आणि स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान तर्फे स्किझोफ्रेनिया दिन साजरा

DSC_4521

जागतिक स्किझोफ्रेनिया दिनाचे औचित्य साधून, शांती नर्सिंग होम आणि स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे, पुणे येथील सुप्रसिध्द ज्येष्ठ मानसोपचार तज्ञ डॉ विद्याधर वाटवे हे होते.

दरवर्षी, या दोन्ही संस्थाव्दारा २४ मे रोजी स्किझोफ्रेनिया या मानसिक आजारासंबंधी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

आय. एम. ए. हॉल येथे आयोजित या कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. श्रृती ढवळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर डॉ. कस्तुरी बा-हाळे यांनी सुरेल आवाजात प्रार्थना सादर केली. प्रार्थनेनंतर  मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

पाहुण्यांचा परिचय सौ अस्मिता कुलकर्णी यांनी करुन दिला तर डॉ. चिन्मय बा-हाळे यांचे हस्ते शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.

त्यानंतर सौ अमृता पंजाबी यांनी शांती नर्सिंग होम आणि स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान या दोन्ही संस्थांचा उपस्थितांना थोडक्यात परिचय करुन दिला.

या आजारावर उपचार घेऊन बरे झालेल्या काही रुग्णांनी  तसेच काही रुग्णांच्या नातेवाईकांनी आपले अनुभव कथन केले.

संस्थेचे सचिव श्री शिवकुमार पाडळकर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.  

कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवर डॉक्टर्स, प्रतिष्ठित व्यक्ति तसेच या आजाराशी संबंधीत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांची उपस्थिती होती.

 

DSC_4547

DSC_4653

DSC_4667

एक टिप्पणी सोडा

Your email address will not be published.

WordPress Video Lightbox Plugin