आजचे शांती नर्सिंग होम

मानसिक आजाराचे प्रमाण आणि व्याप्ती खुप मोठी आहे. तर ताण तणावाचे नियोजन हि एक वेगळीच आजची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या मानसिक आजाराची लक्षणे आणि ताण तणावाची लक्षणे बऱ्याच वेळेला सारखीच असतात. योग्य उपचारांसाठी ते ओळखणे महत्वाचे आहे आणि त्यासाठी तज्ञ मंडळीच हवीत. तसेच तज्ञांना योग्य त्या सोयी हव्यात. त्यांना ते हाताळण्याचा अनुभव हवा. याशिवाय बऱ्याच वेळा योग्य निदान व इलाजासाठी तज्ञांची परस्पर आपसात संवाद हवा. यातच रुग्णाचे हित आहे. या गोष्टी लक्षात घेऊन शांती नर्सिंग होमचे कार्य चालते. हे सर्व छान प्रकारे चालू आहे पण अजून खूप छान गोष्टी घडायच्या आहेत.

येथे सध्या असलेल्या सोयी:

१. तज्ञांचा स्टाफ

२. आवश्यक सोयी सुविधा

३. हॉस्पिटल परिसर

४. आजपर्यंत हॉस्पिटलचे केलेली, शैक्षणिक कार्ये तसेच संशोधन आणि सामाजिक कार्ये

१. तज्ञांचा स्टाफ

    • मानसरोग तज्ञ
    • मानसशास्त्राचे तज्ञ
    • सायकीयाट्रिक सोशल वर्कर
    • कौन्सेलर
    • व्ययसाय मार्गदर्शन
    • नर्सिंग स्टाफ
    • सायकोथेरपिस्ट, बिहेवियर थेरपिस्ट
    • प्रयोग शाळेमधील टेक्निकल स्टाफ
    • ई.ई.जी. टेक्निशियन
    • रिसर्च स्टाफ
    • लायब्ररीयन

२. आवश्यक सोयी आणि सुविधा

    • ओ.  पी.  डी.
    • अत्यावश्यक सेवा
    • आय.  पी.  डी.
    • प्रयोगशाळा
    • ई. ई. जी.
    • सायकोमेट्रिक टेस्टिंग
    • माईंड ट्रेनिंग सेंटर
    • ई. सी. टी.
    • फार्मसी
    • डी अडीक्षण
    • डे केअर सेंटर
    • सोशल वर्क विभाग
    • शैक्षणिक आणि संशोधन
    • लायब्ररी
    • लेक्चर हॉल
    • ग्रुप थेरपी
    • केअर गीवर्स प्रोग्राम

ओ. पी. डी. :

वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ०६ पर्यंत. १५० ते २०० लोक बसण्याची व्यवस्था, रिसेप्शन व ४ कन्सल्टींग रूम्स. स. १० ते सं. ०६ या वेळेत चार मानसरोग तज्ञ आपापल्या कन्सल्टींग रूम्स मध्ये तपासण्याचे काम करतात. पूर्ववेळ ठरवून आलेल्या रुग्णास त्याप्रमाणे प्राधान्याने तपासण्यात येते.

अत्यावश्यक सेवा :

२४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध. दोन मेडीकल ऑफीसर आणि एक सायकीयाट्रीक या विभागासाठी आहे. इमर्जन्सीत लागणारी सर्व मेडिकल व सायकीयाट्रीक औषधी व इतर साधनांची सोय.

आय. पी. डी. :

७० बेड्स असलेल्या या हॉस्पिटलमध्ये तीन प्रकारच्या व्यवस्था आहेत.

१. जनरल रूम फक्त ३ रुग्णांसाठी

२. सेमीस्पेशल रूम फक्त २ रुग्णांसाठी

३. स्पेशल रूम फक्त १ रुग्णासाठी

डॉक्टर्सं व ऑन राउंड :

शांती नर्सिंग होमच्या नियमानुसार रुग्णाबरोबर जवळची नातेवाईक असलेली एक व्यक्ती २४ तास असणे आवश्यक आहे.

नर्सिंग, मेडीकल स्टाफ, २४ तास उपलब्ध रोज सिनिअर सायकीयाट्रीस्टचा राउंड. शिवाय एक सायकीयाट्रीस्ट आणि मेडिकल ऑफिसरची २४ तास उपस्थिती.

मोकळे वातावरण आणि खूप खेळती हवा असलेल्या खोल्या.

सायकोमेट्रीक टेस्टींग :

व्यक्तिमत्व तपासणे

बुध्यांक काढणे

आणि इतर उपयुक्त मानसिक तपासण्या येथे होतात.

सोशल वर्क :

मानसिक आरोग्यासाठी सोशल वर्क हे अत्यंत महत्वाचे काम आहे. शांती नर्सिंग होम मधील सोशल वर्क विभागाने पुनर्वसनासाठी; रुग्ण ज्या ठीकाणी काम करतो त्या ठीकाणी काम निर्माण करण्यासाठी; ज्यामुळे रुग्णाला आजाराचा स्टिग्मा वाटू नये म्हणुन खूप भरीव काम केले आहे.

शैक्षणिक आणि संशोधन :

या साठीच्या आवश्यक सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत.

माईंड ट्रेनिंग सेंटर :

माईंड ट्रेनिंग सेंटर या विभागात; मानसिक आजाराचा ऊपचार वेगवेगळ्या मानसोपचाराच्या पद्धती वापरून केला जातो. या ठीकाणी वापरण्यात येणाऱ्या मानसोपचार पद्धतीचे सर्वसाधारणपणे तीन प्रकारात विभाजन करता येईल.

१. वर्तणुक ऊपचार

२. कौन्सेलिंग

३. मानसोपचार

या उपचारांची माहिती थोडक्यात खालील प्रमाणे

१. वर्तणूक ऊपचार :

मानसशास्त्र हे मनाचे नाही तर वर्तणुकीचे शास्त्र आहे. असे म्हणणारे शास्त्रज्ञ म्हणजे बिहेविअर थेरपी. आपण वागायला कसे शिकतो, आपली वर्तणुक कशी घडते किंवा बिघडते. शास्त्रज्ञांचे मते या मागील तत्व म्हणजे कंडिशनिंग. (Behavior is conditioned response). सामान्य असो की अपसामान्य, वर्तणूक शिकण्यातून घडते (Principles of learning). या तत्वावर आधारित ऊपचार पद्धतीस वर्तणुक ऊपचार पद्धत  (Behavior Therapy) असे म्हणतात.

ही ऊपचार पद्धत म्हणजे एक प्रकारचे ट्रेनिंग असते. (प्राण्यांचे ट्रेनर असतात न तसेच); ही पद्धत फोबिया (भयगंड) ऑब्सेसिव कम्पलसिव डिसोर्डेर (विचार आणि कृती परत परत करण्याचा मानसिक आजार) या व इतर अनेक आजारात आवश्यकते नुसार, आमच्या या माईंड ट्रेनिंग सेंटरमध्ये वापरतात.

वर्तणुक उपचारांत मानवी विचार व भावनांचे महत्व ध्यानात घेऊन ज्या वर्तणुक ऊपचार पद्धतीचा वापर होतो त्यास राशनल ईमोटिव थेरपी (अल्बर्ट एलिस) आणि कॉगनिटिव बिहेविअर थेरपी (अरॉन बिक) असे म्हणतात.

आपल्या वर्तणुकीच्या (प्रतिक्रिया) मागे घटनांची एक साखळी असते ती अशी

बाह्य घटना – विचार – भावना – प्रतिक्रिया

या साखळीतील विचार, भावना आणि बदललेल्या प्रतिक्रिया दोन नियम अरॉन बिक याने शोधून काढले. या कॉगनिटिव बिहेविअर थेरपीचा उपयोग उदासपणाचा मानसिक आजार, चिंता रोग आणि इतर अनेक मानसिक आजारात जगभर करतात तसेच येथील माईंड ट्रेनिंग सेंटर मध्येही करतात.

समुपदेशन (Counseling)

समुपदेशन म्हणजे सल्ला देणे होय. समुपदेशन (Counseling) या शब्दाचा हा डिक्शनरीतील अर्थ आहे. परंतु या ठीकाणी या शब्दाचं स्वरूप जरा व्यापक आहे. समुपदेशन करतांना व्यक्तीच्या भावभावना त्यांचे संस्कार प्रश्नाचे स्वरूप हे सर्व लक्षात घेतले जाते. भावनिक आधार देऊन परिस्थितीतून मार्ग काढण्याचे पर्याय सुचविले जातात.

समुपदेशनाची गरज कोठे असते?

१. ताणतणाव

२. आजारी असतांना

३. अपंगत्व

४. अडचणीत

५. व्याधीत

समान प्रश्न किंवा समान आजार असलेल्या एकापेक्षा अधिक व्यक्तींचे समुपदेशन ग्रुप मध्ये करता येते. त्यास गट चर्चा (Group Counseling) म्हणतात. याचे निश्चितच काही फायदे आहेत. तसेच एकट्या व्यक्तीचे देखील समुपदेशन करणे काही वेळा आवश्यक ठरते त्यास व्यक्तीगत समुपदेशन (Individual Counseling) असे म्हणतात.

समुपदेशनात वेगवेगळ्या तत्वांचा व तत्वज्ञानाचा उपयोग होतो. उदा. : कार्ल रॉजर्सच्या तत्वानुसार माणसे हि मुलत: चांगली असतात. आपण आपल्या आयुष्याचे मार्ग क्रमण करण्यास समर्थ असतो आणि त्यास पाहिजे तसे वळणही देऊ शकतो. हे समजले की माणुस त्याचे प्रश्न स्वत:च चांगल्या रितीने सोडवू शकतो. रॉजर्सच्या इलाज पद्धतीत व्यक्तीचा स्वतःत बदल घडवून आणण्याचा आत्मविश्वास वाढतो. या उपचारास क्लायंट सेंटर्ड कौन्सेलिंग असे म्हणतात.

अशा प्रकारे वेगवेगळ्या विचारांचा आणि तत्वज्ञानाचा प्रभाव कौन्सेलिंग देण्याच्या पद्धतीवर पडलेला दिसून येतो.

मानसिक आजाराची जाण असणारे व कौन्सेलिंग योग्यप्रकारे करणारे कौन्सेलर्स शांती नर्सिंग होम मध्ये माईंड ट्रेनिंग सेंटर विभागात आहेत.

मानसोपचार – Psychotherapy

मनोविकार, वर्तणुक समस्या, ताण तणाव या सर्वांवर चर्चा या माध्यमातुन बरे करण्याच्या उपचार पद्धतीस सायकोथेरपी असे म्हणतात. मानसोपचार (psychotherapy) चे वेगवेगळे प्रकार आहेत. शांती नर्सिंग होम येथे बहुतेक वेळा खालील तीन प्रकारच्या थेरपींचा उपयोग केला जातो.

१) सपोर्टिव्ह सायकोथेरपी

२) इंटर पर्सनल सायकोथेरपी

३) इन साईट सायकोथेरपी

सपोर्टिव्ह सायकोथेरपी (Supportive Psychotherapy)

या उपचार पद्धतीत रुग्णाच्या भावनांना मोकळी वाट मिळून त्यांना धीर देण्याचे काम होते. या किंवा इतरही सायकोथेरपीत रुग्णाला आठवड्यातुन निदान एक वेळा चर्चेसाठी दवाखान्यात येणे आवश्यक असते. साधारण ३० ते ४० मिनिटे एका वेळेस चर्चेसाठी देण्यात येतात. रुग्णाला धीर देणे, हरवलेला स्वाभिमान व स्वप्रतिमा परत रुग्णाच्या मनात निर्माण करणे हे काम या उपचारामुळे होतेच. त्या बरोबर व्यक्तीचे स्वतःचे प्रश्न सोडवण्यास या उपचार पद्धतीमुळे मदत मिळते.

ताण तणाव व मानसिक आजारात या उपचाराची गरज असते.

इंटर पर्सनल सायकोथेरपी

मनोविकृती होण्यात मानवी नाते आणि ऋणानुबंध महत्वाचे मानले जातात. आपल्या बऱ्याच समस्या व दु:ख हे नात्यातील तणाव का निर्माण होतो.

१. मतभेद

२. नात्यातील भूमिकेत बदल झाल्यामुळे (नवीन नाते निर्माण झाल्यामुळे)

३. नाते तुटल्यामुळे किंवा जवळच्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यामुळे

४. नाते टिकवण्यातील वैयक्तिक कौशल्याच्या कमतरतेमुळे

या इलाज पद्धतीमुळे नात्यातील समस्या सुधारण्यास मदत होते.

इनसाईट सायकोथेरपी

रुग्ण्याच्या मनातील संघर्ष, आशा, आकांक्षा या गोष्टी त्याच्या आजारास, चिंतेस, उदासपणास कारणीभूत असतात. थेरपिस्ट (उपचार करणारा) आपले कौशल्य वापरून त्या दडलेल्या संघर्षपूर्ण विचारांना रुग्णाच्या जाणिवेपर्यंत आणण्याचे काम करतो. जाणीवा निर्माण झाल्या की उणीवा कमी होतात. त्यात थेरपिस्टची मदत रुग्णामध्ये सुधार घडवून आणण्यास पुरेशी ठरते. या उपचारामार्फत रुग्णाला आत्मचिंतनास मदत मिळते.

बोलून बरे करणाऱ्या या आणि इतर पद्धतीत इलाजाचे माध्यम भाषा आहे. बहुसंख्य निरक्षर, लोकांना किंवा बऱ्याच थोडेफार शिकलेल्या लोकांना या माध्यमाचा वापर थोडाफार करता येत नाही. यासाठी द्यावा लागणारा वेळ बरेच रुग्ण देऊ शकत नाहीत आणि काही वेळा मनोविकार तज्ञही त्यासाठी फारसा वेळ देऊ शकत नाहीत. पण ही उणीव शांती नर्सिंग होम मध्ये एक वेगळे डीपार्टमेंट काढुन त्यासाठी खास तज्ञांची नेमणुक करून भरून काढली आहे.

वरील सर्व गोष्टी माइंड ट्रेनिंग सेन्टरमध्ये नियमित स्वरूपाने चालु  आहेत.

व्यसनमुक्ती विभाग (De-Addiction Centre)

दारूचे व्यसन हा एक मानसिक आजार आहे. – जागतिक आरोग्य संघटना

दारूच्या आहारी गेलेला माणुस हा वाईट माणुस नाही तर आजारी आहे हे लक्षात येणे महत्वाचे आहे, हे लक्षात आले तरच इलाजासाठी रुग्ण म्हणुन त्यास दवाखान्यात आणले जाईल. सुरुवात जरी मौज म्हणुन झाली तरी नंतर …. टक्के लोकांमध्ये शरीर आणि मनाची ती गरज बनते. दारू पिण्यासाठी प्रत्येकाची सुरुवात होण्याचे कारण वेगळे असेल, व्यक्ती म्हणुन तो वेगळा असेल पण प्रत्येकाच्या अध:पतनाचि कहाणी मात्र जवळपास सारखीच असते.

दारूचे व्यसन हा एक जुनाट आजार आहे. दारूवर नियंत्रण नसणे हे त्याचे मुख्य लक्षण आहे. दारूमुळे निर्माण होणारे, मानसिक, सामाजिक, कौटुंबिक आणि कायद्याचे त्रास हे त्याचे परिणाम आहेत. (व्याख्या : नैशनल कौन्सिल ऑन अल्कोहोलिझम, अमेरिका – १९९२).

शांती नर्सिंग होमच्या सुरुवातीपासून (१९७९) या आजाराचा इलाज सुरु होताच, पण या आजाराच्या कारणांची, परिणामाची व उपचाराची व्याप्ती लक्षात घेऊन मित्र ग्रुप आणि व्यसनमुक्ती विभागाची सुरुवात झाली ती १६ नोव्हेंबर २००१ रोजी या विभागाचे प्रमुख आहेत डॉ. विनायक पाटील आणि त्यांच्या बरोबरीने काम करण्यासाठी सायकियाट्रिक सोशल वर्कर () क्लिनिकल सायकोलोजिस्ट, मेडिकल ऑफिसर असतात.

मित्र ग्रुप

व्यसन त्या मानसिक आजारात ग्रुप थेरपीचे महत्व लक्षात घेऊन सुरु केलेला हा ग्रुप आहे. दर शुक्रवारी दुपारी १२ वाजता मद्यपि रुग्णांसाठी हे चर्चा सत्र आयोजित केले जाते. अनुभव कथन, मार्गदर्शन तसेच व्यसनमुक्ती संबंधी वेगवेगळ्या विषयावर चर्चा या ग्रुपमध्ये होते. या ग्रुपसाठी डॉ. पाटील यांनी एक कविता लिहिली. ती अशी :

“हा लेख लिहिण्याबद्दलचा मुख्य हेतू हा आहे की लोकांच्या मनातील ‘शॉक ट्रिटमेंट’ बद्दलचे गैरसमज दूर करणे. मी, विद्यासागर सोनकांबळे, वय २९ वर्षे, स्वतः एक मेडिकलचा विद्यार्थी आहे. मी गेल्या ८ ते १० वर्षांपासुन ‘सोशल फोबिया’ (चार चौघात मिसळण्याची भीती), डिप्रेशन (नैराश्य) व न्यूनगंड या मानसिक आजारांनी त्रस्त होतो. यामुळे माझ्या जीवनाचे खूप नुकसान झालेले आहे. मी नेहमी एकटा एकटा राहत असे. इतरांमध्ये मिसळण्याची मला लाज व भीती वाटायची. वाटायचे की सगळ्यांसमोर  अपमान होईल, सगळे माझ्यावर हसतील. त्यामुळे मी शक्य तेवढं इतरात मिसळण्याचे टाळायचो.

सुरुवातीला मला व घरच्यांना वाटायचं की माझा स्वभावच असा आहे. परंतु मी १२वीत असताना एका एका दिवशी ‘पुण्यनगरी’ या वर्तमानपत्रातील ‘सोशल फोबिया’ या नावाचा एक लेख माझ्या वाचण्यात आला. तो लेख वाचताना मला जाणवले की हे सगळ माझ्यासोबतही होतंय! याचा अर्थ दोष माझ्या स्वभावात नव्हता तर मी एका मानसिक आजाराने पिडीत होतो, याचा अर्थ मी बरा होऊ शकत होतो.

मग मी मानसोपचार तज्ञांना भेटायचं ठरवलं. मग मी मागील ८ ते १० वर्षात बऱ्याच मानसोपचार तज्ञांना भेटलो, बरीच वर्षे गोळ्या औषध घेतली, परंतु माझ्यात काही फरक पडला नाही. मग मी ध्यान, प्राणायाम, व्यायाम, प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन, हिप्नोटिझम हे सर्वसुद्धा करून पाहिलं, तरी माझ्यात काहीही फरक पडला नाही. (कृपया गैरसमज करून घेऊ नका, मी या गोष्टींवर टीका करत नाहीये, हा माझा वैयक्तीक अनुभव असू शकतो.) मी इतक्या खोल नैराश्यात गेलो होतो की मी देवधर्म, राशी-रत्न, विविध कर्मकांड इ. उपायसुद्धा केले! परंतु नेहमीप्रमाणे माझ्यात काहीच फरक पडला नाही (कृपया असा गैरसमज करून घेऊ नका की या गोष्टींमुळे देवाने माझी व डॉ. बाऱ्हाले सरांची भेट घडवून आणली, कधी कधी माणूस इतका हताश होतो की कोणीही काहीही सांगितलं तरी तो ते करायला लागतो) मला जीवन जगणेही व्यर्थ वाटू लागले होते.

मग माझ्या डोक्यात डॉ. बाऱ्हाले सरांना भेटण्याचा विचार आला व मी त्यांची भेट घेतली. सरांनी मला ‘गोळ्या औषधांसोबातच’ ‘शॉक ट्रीटमेंट’ घेण्याचा सल्ला दिला व मीसुद्धा त्यासाठी तयार झालो. परंतु सुशिक्षित असुनसुद्धा माझ्या घरच्यांना वाटू लागले की मी ‘शॉक ट्रीटमेंट’ घेण्याचा सल्ला दिला व मीसुद्धा त्यासाठी तयार झालो. परंतु सुशिक्षित असूनसुद्धा माझ्या घरच्यांना वाटू लागले की ‘शॉक ट्रीटमेंट’ मुळे कायमचाच वेडा होईन! परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो व ते कसे बसे तयार झाले व माझी ‘  ’शॉक ट्रीटमेंट’ चालू झाली!

मी सकाळी ७ वाजता आईसोबत व मावस भावासोबत रिक्षाने शांती नर्सिंग होमला जायचो. पहिल्यांदा डॉ. पाटील सर ‘शॉक ट्रीटमेंट’ च्या सगळ्या रुग्णांना चेक करायचे, त्यानंतरच प्रत्येक रुग्णाला ’शॉक ट्रीटमेंट’ देण्यात येत असे. यामध्ये रुग्णाला फक्त थोड्यावेळासाठी पूर्ण भूल देण्यात येते व त्यानंतर एक सेकंदापेक्षाही खूप कमी वेळासाठी शॉक देण्यात येतो. मग रुग्णाला थोड्यावेळासाठी झोपू देण्यात येते व शुद्ध आल्यानंतर ‘घरी’ अथवा रुग्ण अडमीट असेल तर ‘वार्डमध्ये’ पाठविण्यात येते.

या ट्रीटमेंटमुळे तात्पुरता स्मृतिभ्रंश सोडल्यास मला कसल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ही ट्रीटमेंट खूप सुरक्षित आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचा धोका नाही. अथवा या ट्रीटमेंटचे काहीही गंभीर दुष्परिणाम नाहीत. उगाच कोणाकडूनही काहीही चुकीच्या गोष्टी ऐकुन गैरसमज करून घेऊ नका. तुम्ही माझेच उदाहरण पहा. मी तर एक मेडिकलचाच विद्यार्थी आहे. अशाप्रकारे माझी ‘शॉक ट्रीटमेंट’ पूर्ण झाली आणि . . .

आणि . . . आश्चर्य घडलं, जणू काही जादूच झाली! ‘शॉक ट्रीटमेंट’च्या दुसऱ्याच सेषणपासून माझा आजार एकदम ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाला! असे मला सरांनी ’शॉक ट्रीटमेंट’चे १० सेशन दिले ओ व आता मी ९० टक्के पूर्णपणे बरा झालेलो आहे. मी सरांनी दिलेल्या औषध गोळ्या एकदम नियमित पणे घेतो. मी डॉ. बाऱ्हाले सर, डॉ पाटील सर, डॉ. श्रुती कु. कालिंदा, दुशिंग भैय्या, केदारे भैय्या व शांती नर्सिंग होमच्या सर्व स्टाफचा कायम अत्यंत ऋणी राहीन. शेवटी मी एवढंच म्हणेन की ’शॉक ट्रीटमेंट’ ही एक ‘नैराश्यातून आशादायी जीवनाकडे नेणारी ट्रीटमेंट!”

व्यसनमुक्तीचा सोहळा :

मित्र ग्रुपच्या सदस्यांपैकी जे सदस्य व्यसनमुक्तीचे एक किंवा अधिक वर्ष पूर्ण करतात अशा मित्रांचा व त्यांच्या कुटुंबियांचा एक सत्कार सोहळा प्रतिष्ठीत व्यक्तीच्या हस्ते मोठ्या प्रमाणात शांती नर्सिंग होम येथे होतो. हा सोहळा जागतिक आरोग्य दिनाचे (७ एप्रिल) औचित्य साधुन साजरा केला जातो.  व्यसन हा शारीरिक मानसिक तेवढाच सामाजिक प्रश्न पण आहे. त्याची जाण निर्माण करणे हा पण हेतू या कार्यक्रमाचा आहे.

एकूण असे दारू पिणे या मानसिक आजार असलेल्या रुग्णांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक सर्व बाजूंनी विचार करून व्यसनमुक्ती केंद्रात इलाज केला जातो.

ई. सी. टी. (Electro Convulsive Therapy)

लाईट ट्रिटमेंट / शॉक ट्रिटमेंट

लाईट ट्रिटमेंट / शॉक ट्रिटमेंट या इलाजाचा वापर खालील मानसिक आजारात करतात.

१. उदासपणाचा मानसिक आजार

२. स्किझोफ्रेनिया

३. आत्महत्येची प्रवृत्ती असणारे मानसिक आजार

लाईट ट्रिटमेंट / शॉक ट्रिटमेंट घेतांना रुग्णाला मुळीच त्रास होत नाही. योग्य प्रकारे वापरल्यास धोका होत नाही आणि अतिशय परिणामकारक अशी ही इलाज पद्धत आहे. It is painless, safe and very effective treatment.

शॉक ट्रीटमेंट म्हटल्यावर रुग्णाला आणि त्याच्या नातेवाईकास भिती वाटते, कारण या इलाजासंबंधी एका डॉक्टर असलेल्या रुग्णाचा अनुभव, त्याने ई. सी. टी. घेतल्या नंतर त्याच्याच शब्दात असा

“हा लेख लिहिण्याबद्दलचा मुख्य हेतू हा आहे की लोकांच्या मनातील ‘शॉक ट्रिटमेंट’ बद्दलचे गैरसमज दूर करणे. मी, विद्यासागर सोनकांबळे, वय २९ वर्षे, स्वतः एक मेडिकलचा विद्यार्थी आहे. मी गेल्या ८ ते १० वर्षांपासुन ‘सोशल फोबिया’ (चार चौघात मिसळण्याची भीती), डिप्रेशन (नैराश्य) व न्यूनगंड या मानसिक आजारांनी त्रस्त होतो.

अपवाद वगळता सर्वांचाच अनुभव असा आहे.

इलाजास आवश्यक असणारे तज्ञ अनस्थेटिस्ट, मानसरोग तज्ञ, नर्सिंग स्टाफची उपलब्धता शांती नर्सिंग होममध्ये आहे. तसेच ई. सी. टी. देण्याआधी लागणारी सर्व तपास यंत्रणा व ई. सी. टी.साठी लागणारी सर्व अद्ययावत मशिनरी, औषधी व इमर्जन्सी मेडिसीन हे सर्व या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे.

डे केअर सेंटर

स्किझोफ्रेनिया आणि इतर मोठ्या आणि जुन्या मानसिक आजारात ई. सी. टी. आणि औषधोपचाराशिवाय इतर पुरक उपचार खुप महत्वाचे आणि रुग्णाला उभारी देणारे असतात.

शांती नर्सिंग होमच्या डे केअर सेंटरमध्ये अशा पुरक उपचार पद्धती तज्ञांच्या मार्फत देण्यात येतात. येथील तज्ञ मंडळीत सायकियाट्रिस्ट, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, सोशल वर्कर, सायकोलोजिस्ट, कॉग्निटिव्ह रीमेडीयेशन थेरपिस्ट असतात आणि ही पूर्ण टीम या ठीकाणी काम करते.

१. भावना २. कामाची प्रेरणा ३. मोकळेपणा ४. परस्पर संबंध ५. सुसंवाद ६. लक्ष्यात रहाणे ७. नेहमीचे काम व्यवस्थित करता येणे. या नॉर्मल व्यक्तीत आढळणाऱ्या गोष्टींचा अभाव न्यास अभावाची लक्षणे म्हणतात. जी बऱ्याच वेळा नेहमीच्या औषधी आणि ई. सी. टी.ने बरी होत नाहीत त्यांना डे केअर सेंटर मधील उपचार फायदेशीर ठरतात.

डे केअर सेंटर मधील पुरक उपचार सर्व साधारणपणे खालील प्रकारचे असतात.

१. कौन्सेलिंग

२. फमिली थेरपी

३. पुनर्वसन

४. वर्तणुक उपचार

५. आणि गरजेनुसार इतर उपचारांच्या सोयी

  • सामाजिक कार्ये (Social Work) :

१.    अंधश्रद्धा निर्मुलन आणि समाज प्रबोधन :

रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या मानसिक आरोग्या सोबतच सर्व साधारण लोकामध्ये मानसिक रोगांसंबधी असलेले समज, गैरसमज, भयगंड दुर करण्याकरिता देखील शांती नर्सिंग होमने गेल्या ३४ वर्षांपासून अथक परिश्रम केलेले आहेत.

रुग्णालयातर्फे महाराष्ट्रात निरनिराळ्या गावांमध्ये, तसेच आश्रमांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन शिबीरे घेतलेली आहेत. मानसिक रुग्णांवर अंधश्रद्धेपोटी घातक इलाज करणे अथवा कोणताही इलाज न करता रुग्णांची मानसिक व शारिरीक स्थिती अधिकच बिघडवणे या विरुद्ध सामाजिक प्रबोधनाचे कार्य मोठ्या प्रमाणावर चालत आलेले आहे.

२. मोफ़त डे केअर सेंटरचे काम

मानसिक रुग्णांच्या पुनर्वसनाकरिता तसेच त्यांच्या व्यवसाय कौशल्यांचा विकास व्हावा, त्यांना स्वतःच्या पायावर उभे रहाता यावे याकरिता आवश्यक ते प्रशिक्षण शांती नर्सिंग होम येथे देण्यात येते. याकरिता रुग्ण दररोज सकाळी येथे येतात. दिवसभर येथील थेरपिस्ट त्यांचेकडून फाईल बनविणे, दिवाळीच्या पणत्या बनविणे, पिशव्या शिवणे, शुभेच्छापत्रे बनविणे, फिनाईल बनविणे व त्याचप्रमाणे व्यायाम, योगासने, प्राणायाम, खेळ इ. करून घेतात. विशेष म्हणजे हा उपक्रम रुग्णांकरिता संपूर्णतः मोफत राबविण्यात येतो.

३. केअर गीव्हर्स अवेअरनेस प्रोग्राम

शांती नर्सिंग होमचा आणखीन एक महत्वाचा व अत्यंत यशस्वी ठरलेला उपक्रम म्हणजे ‘स्किझोफ्रेनिया स्वास्थ्य आणि पुनर्वसन प्रतिष्ठान’. या ट्रस्टची स्थापना २००३ साली झाली. स्किझोफ्रेनिया रुग्णांचे नातेवाईक (केअर गीव्हर्स) यांना वेळोवेळी मार्गदर्शन तसेच समुपदेशनाची गरज पडते. त्याकरिता दर महिन्याच्या चौथ्या रविवारी दु. १२ वाजता शांती नर्सिंग होम येथे नि:शुल्क बैठक घेतली जाते. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आलेले आहेत.

प्रतिष्ठानच्या माध्यमातून लढा देऊन महाराष्ट्र शासनाची, अपंगांसाठी असलेली, एस. टी. प्रवासातील ७५ टक्के सवलत मानसिक रुग्ण असलेल्या रुग्ण व सोबतचे नातेवाईक यांना लागू करून घेण्यात आली. आज या माध्यमातून अनेक रुग्ण व नातेवाईक यांना प्रवास भाड्यातील सवलतीचा लाभ मिळत आहे.

शैक्षणिक आणि संशोधन (Education & Research):

१. अनेक वर्षांपासून शांती नर्सिंग होम हे अनेकविध शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना मानसशास्त्राचे प्रशिक्षण देत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सायकोलोजी व सोशल वर्क अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम अनेक वर्षे राबविण्यात आला.

२. एम. जी. एम. मेडिकल कॉलेज, औरंगाबाद येथील एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांना अनेक वर्षे मानसशास्त्राचे शिक्षण देण्यात आले.

३. इ. स. २००४ मध्ये हॉस्पिटलमध्ये डी. पी. एम. व इ. स. २००८ मध्ये डी. एन. बी. हे अभ्यासक्रम चालू करण्यात आले. अनेक वर्षे हा अभ्यासक्रम सातत्याने राबविण्यात येऊन, आज (मानसिक रोग तज्ञ म्हणून) १७ डी. पी. एम. व ३ डी. एन. बी. विद्यार्थी यशस्वीरीत्या समाजात कार्यरत आहेत.

४. शैक्षणिक कार्याचा महत्वाचा भाग म्हणजे नर्सिंग कोर्सच्या मुलांना देत असलेले मानसशास्त्रातील प्रशिक्षण. आज मितिस शांती नर्सिंग होम सोबत ८ ते ९ संस्था संलग्न असून त्यात एम. एस्सी., बी. एस्सी., आर. जी. एन. एम. तसेच फ़िझिओथेरपि या कोर्सच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक सराव व प्रशिक्षण तसेच अभ्यासक्रमातील अवघड विषयांवर मार्गदर्शन शांती नर्सिंग होमच्या विविध विषयातील तज्ञांकडून दिले जाते. त्याकरिता या विद्यार्थ्यांकडून नाममात्र शुल्क आकारले जाते.

५. याशिवाय अनेक विद्यापीठ व कॉलेजेस मधून विद्यार्थी येऊन कामकाजासंम्बधी प्रबोधन घेऊन जातात. त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम न थकता व कंटाळता दवाखान्यातील तज्ञ करीत असतात.

४. हॉस्पिटलचा परिसर : रुग्णालयाच्या आवारात आल्यावर सर्वात प्रथम नजरेत भरते ते येथील हिरवेगार व प्रसन्न वातावरण. याच वातावरणामुळे येथे आल्यानंतर मानसिक रुग्णालया विषयी असलेले पूर्वग्रह दूर होण्यास मदत होते.

रुग्णालयास भेट दिल्यानंतर काही महत्वाच्या व्यक्तींचे मनोगत त्यांच्याच शब्दात :

 

आदरणीय स्व. नानाजी देशमुख यांच्या शब्दात, ‘मानसिक रोगियोका आवासीय उपचार केंद्र भी उच्चतम श्रेणिका स्वच्छ एवं साफसुथरा हो सकता है इसकी मुझे अपेक्षा नहीं थी, इस कारण यहा की स्वच्छता देखकर मै चकीत रह गया।’

एका नामवंत मानसोपचार तज्ञांच्या मते, ’हॉस्पिटलचा आराखडा व मांडणी अतिशय चांगली आहे. तसेच दवाखान्यात मानसिक रुग्णाकरिता आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. रुग्णालयाचा परिसर अतिशय हवेशीर, प्रकाशमान व प्रसन्न आहे.’

तसेच माजी अध्यक्ष – इंडियन सायकीयाट्रिक सोसायटी (वेस्ट झोन) – यांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ‘रुग्णालयाचा परिसर अतिशय स्वच्छ, नीटनेटके, हवेशीर, प्रसन्न आहे. ही गोष्ट मानसिक रुग्णांच्या उपचाराकरिता अतिशय उपयुक्त आहे.’

माजी अधीक्षक मेडीकल कॉलेज जयपूर यांच्या शब्दात सांगायचे झाले तर, ‘रुग्णालयात असलेल्या सुविधा व त्यासाठी आकारला जाणारा दर जर पाहिला, तर खाजगी क्षेत्रात अतिशय कमी दरात मानसिक रुग्णांना सेवा  देण्यात हे रुग्णालय आदर्श ठरेल.’