‘मित्र ग्रुप’ तर्फे शांती नर्सिंग होम येथे व्यसन मुक्तांचा सत्कार…!!!

व्यसनमुक्तांचा सत्कार करतांना मा. श्री. विष्णुपादानंद स्वामी.

शांती नर्सिंग होम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून माणूसकीचा सोहळा साजरा करण्यात आला. या प्रसंगी सुरुवातीला शहरातील प्रसिद्ध भुलतज्ञ डॉ. संजीव देशपांडे यांचा ‘दारूचे व्यसन – एक मानसिक आजार’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. शांती नर्सिंग होमची ओळख सौ. सई चपळगांवकर यांनी करून दिली. तसेच ‘मित्र’ ग्रुपची ओळख सौ. अमृता पंजाबी यांनी करून दिली. या कार्यक्रमात रुग्णांच्या मार्गदर्शनाबरोबरच, औषधोपचार घेऊन ज्यांची दारू सुटली आहे, अशा व्यसनमुक्तांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला.  या कार्यक्रमासाठी २५० ते ३०० लोकांची उपस्थिती होती.

यंदा या कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथील रामकृष्ण मिशन आश्रमाचे प्रमुख मा. श्री. विष्णुपादानंदजी स्वामी हे प्रमुख होते. श्री विष्णुपादानंदजी यांनी आपल्या भाषणात या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि शांती नर्सिंग होम येथे करण्यात येत असलेल्या एकूणच रुग्णसेवेविषयी प्रशंसोद्गार काढले. या प्रसंगी एक ते चौदा वर्षापर्यंत जे दारूपासून दूर राहिले त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. विनय बाऱ्हाळे यांनी आजाराविषयी शास्त्रीय माहीती आणि त्यावर उपलब्ध असलेले उपचार यावर उपस्थितांचे उदबोधन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रुती ढवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. निखिल खेडकर यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन हे मित्र ग्रुपच्या सौ. वैशाली अवसरमोल – दाभाडे यांनी केले. यावेळी ‘मित्र’ ग्रुपचे संचालक डॉ. विनायक पाटील आणि डॉ. चिन्मय बाऱ्हाळे, डॉ. सौ. सोनाली देशपांडे तसेच शहरातील काही प्रसिद्ध डॉक्टर्स सपत्नीक उपस्थित होते. श्री विजय नांदापूरकर, डॉ. कमलेश मेटकर आणि डॉ. विशाल पाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केले.

एक टिप्पणी सोडा

Your email address will not be published.

WordPress Video Lightbox Plugin