शांती नर्सिंग होम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माणूसकीचा सोहळा साजरा.

DSC_1491

शांती नर्सिंग होम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार दिनांक ०७ जानेवारी २०१८ रोजी ‘माणूसकीचा सोहळा’ हा कार्यक्रम शांती नर्सिंग होमच्या परिसरात साजरा करण्यात आला. यंदा या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक, वक्ते आणि दीपस्तंभ या संस्थेचे संचालक श्री यजुर्वेंद्र महाजन हे उपस्थित होते. या कार्यक्रमात मार्गदर्शनाबरोबरच, औषधोपचार घेऊन ज्यांची दारू सुटली आहे, अशा जवळपास ७० व्यसनमुक्तांचा सपत्नीक सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमासाठी २७५ लोकांची उपस्थिती होती.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री यजुर्वेंद्र महाजन यांनी औषधोपचारांमध्ये सातत्य राखण्याचे महत्व विषद केले. आपल्या बोलण्यात त्यांनी कठीण परिस्थितीवर मात करून यश मिळविलेल्या अनेक लोकांची उदाहरणे दिली. त्याचबरोबर व्यसनमुक्तीच्या या प्रवासात रुग्णासोबतच त्याच्या नातेवाईकांची महत्वाची भूमिका असते असे सांगितले.

शांती नर्सिंग होमचे संचालक डॉ. विनय बाऱ्हाळे  यांनी जाहीर केले कि व्यसन असलेल्या रुग्णांच्या पत्नींना येणाऱ्या ताणाकरिता मैत्रीण नावाचा स्वमदत गट सुरु करण्यात येणार आहे. हा गट दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी शांती नर्सिंग होम येथे घेण्यात येईल.

नेहमीप्रमाणेच कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता शांती नर्सिंग होमच्या टीमने अथक परिश्रम घेतले.

 

DSC_1505 DSC_1499 DSC_1518 DSC_1532 DSC_3458 DSC_1563

एक टिप्पणी सोडा

Your email address will not be published.

WordPress Video Lightbox Plugin