शांती नर्सिंग होम येथील नवीन उपक्रमांचे डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते उदघाटन

Dr. Mohan Agashe, Dr. Jayant Tupkari, Dr. Vidyadhar Watve & Dr. Vinay Barhale
उदघाटनप्रसंगी डॉ. मोहन आगाशे, डॉ. जयंत तुपकरी, डॉ. विद्याधर वाटवे आणि डॉ. विनय बाऱ्हाले
उदघाटनप्रसंगी डॉ. मोहन आगाशे, डॉ. जयंत तुपकरी, डॉ. विद्याधर वाटवे आणि डॉ. विनय बाऱ्हाले

शांती नर्सिंग होमच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुप्रसिद्ध सिनेकलावंत व ज्येष्ठ मनोविकार तज्ञ पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते www.shantinursinghome.com या हॉस्पिटलच्या वेबसाईट उदघाटन करण्यात आले. तसेच लहान मुलांच्या मानसिक आजाराचे निदान व उपचार यासाठी ‘Child Guidance Center’ या विशेष विभागाचे उदघाटन औरंगाबाद पेडियाट्रिक असोसिएशन अध्यक्ष डॉ. तुपकरी यांनी केले. यावेळी पुणे येथील सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉ. विद्याधर वाटवे हे उपस्थित होते.

डॉ. जयंत तुपकरी यांनी बदलत्या काळानुसार मुलांमध्ये वाढत असलेल्या समस्या व त्यावरील उपाय योजनांची गरज एका बालरोग तज्ञाच्या दृष्टीकोनातून सांगितली. तर डॉ. विद्याधर वाटवे यांनी शांती नर्सिंग होमने त्याकरिता एका संपूर्ण विभागाची निर्मिती केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. मोहन आगाशे यांनी आजच्या वेगवान जीवनशैलीमुळे निर्माण होणारे ताण तणाव दूर करण्याकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून interactive वेबसाईट आणि ई – कौन्सिलिंग यासारखे उपक्रम मराठवाड्यात प्रथमच सुरु केल्याबद्दल डॉ. विनय बाऱ्हाले यांचे अभिनंदन केले.

या प्रसंगी डॉ. मोहन आगाशे यांनी ‘सायकीयाट्रि आणि सिनेमा’ या विषयांवर मनोगत व्यक्त करतांना दोन लघुपट दाखवले.

या कार्यक्रमास शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, डॉक्टर, उद्योगपती, व्यावसायिक व समाजसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनय बाऱ्हाले यांनी आपल्या प्रास्ताविकात शांती नर्सिंग होमच्या वाटचालीवर प्रकाश टाकला. तसेच शांती नर्सिंग होमच्या उभारणीत डॉ. विनायक पाटील, सौ. शैला वैद्य व डॉ. सौ. अनुराधा बाऱ्हाले यांचा मोलाचा वाटा असल्याचे नमूद केले. डॉ. चिन्मय बाऱ्हाले यांनी लहान मुलांमधील मानसिक समस्या, त्यांचे निदान व उपचार हे सविस्तर सांगितले. तर डॉ. सोनाली देशपांडे यांनी ई – कौन्सिलिंगचे आजच्या धावत्या जगातील महत्व व त्याचे फायदे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वर्षा मुळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. श्रुती ढवळे यांनी करून दिला. तर आभार प्रदर्शन सौ. अमृता पंजाबी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विजयकुमार नांदापूरकर आणि हॉस्पिटलच्या प्रशासक सौ. सई चपळगांवकर यांनी परिश्रम घेतले.

एक टिप्पणी सोडा

Your email address will not be published.

WordPress Video Lightbox Plugin